पिंपरी (Pclive7.com):- काळेवाडी भागात महाविकास आघाडीला मानणारा वर्ग मोठा असून पूर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे बलाबल आहे. विरोधकांना प्रचारासाठी कार्यकर्ते सुद्धा उपलब्ध होत नसून काळेवाडी भागात महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे हे एकतर्फी आघाडी घेतली असा विश्वास शिवसेनेचे माजी आमदार चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक २०२३ महाविकास आघाडीचे उमेदवार श्री.विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक ३१ आणि ३२ काळेवाडी, नढेनगर, विजयनगर,कोकणेनगर या भागात प्रचाराचा शुभारंभ पंचनाथ देवस्थान येथे शिवसेनेचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी नगरसेवक संतोष कोकणे, नगरसेवक विनोद नढे, नगरसेविका उषा उर्फ माई काळे, नाना काटे यांच्या पत्नी नगरसेविका शीतल ताई काटे प्रभागाचे निरीक्षक नगरसेवक शाम आण्णा लांडे, निरीक्षक नगरसेवक राहुल भोसले, निरीक्षक इखलास सय्यद, सविता धुमाळ, सचिन काळे, कोमल ताई काळे, नवनाथ नढे, काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सायली नढे, किरण नढे, शिवसेनेचे हरीश नखाते, विजय सुतार, सागर शिंदे, प्रशांत तरवते, राष्ट्रवादीचे चंद्रकांत तापकीर, संगीता ताई कोकणे, विजयराव काळे, शामराव काळे, रवी नांगरे, चेतन काटे, योगेश काटे, हेमंत काटे, प्रवीण खरात परिसरातील महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
यावेळी विजयनगर, कोकणेनागर, नढेनगर, पाचपीर चौक, राजवाडे नगर, क्रांतिवीर कॉलनी, सहयोग कॉलनी, शिवकृपा कॉलनी, साईनाथ कॉलनी, सहित इतर परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली. महाविकास आघाडीचा विजय असो या घोषणांनी परिसर दणाणून गेला.

























Join Our Whatsapp Group