पिंपरी (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार श्री विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या निवडणूक प्रचाराच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची महत्त्वपूर्ण बैठक हॉटेल शिवार गार्डन येथे संपन्न झाली. राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष विशाल वाकडकर यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.
सदर बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या विजयाचा निर्धार करण्यात आला. राष्ट्रवादी युवक काँग्रेस पूर्ण ताकदीने प्रभागनिहाय प्रचार करणार आहे. चिंचवड विधानसभेतील राष्ट्रवादी युवकचे पदाधिकारी आपल्याच भागात पूर्ण ताकदीनिशी काम करतील तर भोसरी आणि पिंपरी विधानसभेतील पदाधिकारी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी चिंचवड विधानसभेत जोमाने काम करतील.
पदाधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्या उत्तम समन्वय ठेवून मतदार संघातील शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून विजयश्री खेचून आणू हा निर्धार व्यक्त करण्यात आला.