चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी पिंपळे सौदागर येथील पी.के. इंटरनॅशनल स्कूल या मतदान केंद्रावर त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला.

चिंचवड पोटनिवडणुकी करिता आज दि.२६ रोजी मतदान होत आहे. गेल्या पंधरा दिवस सुरू असलेल्या प्रचारानंतर आज मतदार आपला हक्क बजावणार आहेत. आज सकाळी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांनी पिंपळे सौदागर येथील पी.के इंटरनॅशनल स्कूलमध्ये सव्वा सातच्या सुमारास मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झालेला पिंपरी चिंचवड शहराचा विकास आणि गेल्या पाच वर्षात भाजपने केलेला भ्रष्टाचार या मुद्द्यावरच जनता राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि आपला विजय होईल असा विश्वास नाना काटे यांनी व्यक्त केला.






















Join Our Whatsapp Group