पिंपरी (Pclive7.com):- चिचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपा महायुतीच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी पिंपळे गुरव येथील मतदान केंद्रावर सकाळीच मतदान केले. यावेळी त्यांच्यासोबत भाजपा नेते शंकर जगताप, मुलगी अश्विनी रेणुसे आणि कुटुंबीय उपस्थित होते.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. विरोधकांनी जरी कोणतेही आरोप केले असले तरी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांनी या मतदारसंघात केलेली विकास कामे यांच्या जोरावरच जनता मला मोठे मताधिक्य मिळवून देईल. लक्ष्मण जगताप यांचे नुकतेच निधन झाले असल्यामुळे सहानुभूती ही असणारच आहे. तरी मतदार संघातील जनतेने लवकरात लवकर बाहेर पडून मोठ्या संख्येने मतदान करावे असे आवाहन देखील यावेळी अश्विनी जगताप यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group