चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. या तिरंगी लढतीतील अपक्ष वंचित बहुजनचे पुरस्कृत उमेदवार राहुल कलाटे यांनी ग्रामदैवत म्हातोबा आणि आईचे आशीर्वाद घेऊन आज मतदानाचा हक्क बजावला.
यावेळी घरातील महिलांनी राहुल कलाटे यांच औक्षण करून विजयीभवच्या शुभेच्छा दिल्या. आज सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. सर्व सामान्य जनता बरोबर असल्याने विजय निश्चित असल्याचा विश्वास अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी व्यक्त केला आहे.