चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभा मतदार संघात आज रविवार दि. २६ फेब्रुवारी रोजी मतदान सुरु आहे. सकाळी ७ ते ९ वाजेपर्यंत दोन तासात ३.५२ टक्के मतदानाची नोंद झाली आहे.

चिंचवड मतदार संघामध्ये एकूण ५ लाख ६८ हजार ९५४ मतदार असून ५१० मतदार केंद्रावर मतदान होणार आहे. २६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी सुमारे ३ हजार अधिकारी-कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. अनुपस्थित कर्मचाऱ्यांच्या बदली काम करण्यासाठी ५१ पथके राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदानादिवशी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असुन सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. यासाठी ३७०७ पोलीस कर्मचारी व ७२५ अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.






















Join Our Whatsapp Group