पिंपरी (Pclive7.com):- छत्रपती मराठा साम्राज्य (CMS) संघटनेचे देश आणि विदेशातील कार्याचे कौतुक करण्यासाठी तानिष्क ज्वेलरी सिंहगड रोड पुणे शोरुमचे मालक व मराठा उद्योजक अनिकेत जाधव यांनी संपूर्ण CMS पुणे टीम ला आमंत्रित करून आजपर्यंतच्या सर्व कार्याची माहिती घेतली.

CMS टीम मार्फत नौकरी, शिक्षण, व्यवसाय, वैद्यकीय मदत, कोरोना काळात महाराष्ट्रामध्ये संपूर्ण टीमने झोकून देऊन लाखो बांधवांना केलेल्या मदतीचे व पुरग्रस्त स्थिती सारख्या आपत्तीत १८०० पेक्षा जास्त गरजू बांधवांना संपूर्ण महिन्याचे साहित्य आणि किराणा वाटप या सर्व कार्याबद्दल संपूर्ण CMS टीमचे कौतुक केले. CMS टीम हीच सर्व खरे हिरे आहेत असे संबोधून संपूर्ण टीम चा टाटा समूह मार्फत स्टोअरचे मालक अनिकेत आण्णासाहेब जाधव, सचिन वानखेडे, अमर भोसले, भाग्यश्री जगताप ह्यांच्या संपूर्ण टीमने अभिनंदन करून सन्मानचिन्ह व प्रशतीपत्रक देऊन गौरवण्यात आले.
कोणत्याही सामाजिक कार्यात कोणतीही मदत भासल्यास स्वतः भरीव मदत करणार असल्याचे आश्वासन अनिकेत जाधव यांनी दिले. पुढील कार्यात संपूर्ण CMS सोबत राहून कार्य करण्याची ग्वाही दिली. CMS रक्तदाते या ॲप्लिकेशनची संपूर्ण माहिती घेतली. त्यांनी स्वतः संपूर्ण टाटा समूह आणि तनिष्क ज्वेलर्सच्या सर्व शाखांमध्ये CMS टीम करत असलेल्या रक्तदान जागृतीच्या कार्यात हातभार लावून संपूर्ण टाटा समूहमध्ये रक्तदानचे ॲप्लिकेशन शेअर करणार आहेत. म्हणजे लाखो रक्तदाते आपल्या सोबत जोडले जातील आणि लाखो आणखी जास्त बांधवांना मदत मिळत राहील.
या कार्यक्रमात CMS पुणे टीमचे पदाधिकारी उपस्थित होते. तसेच स्टोअरचे मालक अनिकेत अण्णासाहेब जाधव यांनी कायम CMS टीम सोबत असल्याचे सांगितले. या सन्मानाबद्दल CMS टीम मार्फत संचालक ओंकार देशमुख, दत्ता शिंदे, संदीप नवसुपे, अतुल बिराजदार, राज साळुंखे, स्नेहल गायकवाड, सौ.सुमती नलावडे, अशोक गोळे, निलेश देशमुख, बाबा जाधव, अभिजित जाधव, संपदा नांदवडेकर सह अन्य सभासद तनिष्क ज्वेलर्सला आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन धन्यवाद मानण्यात आले.
Tags: छत्रपती मराठा साम्राज्य ऑर्गनायझेशन संघटनेच्या दिनदर्शिकेचे अनावरणतनिष्क ज्वेलर्सतनिष्क समूहसन्मान





















Join Our Whatsapp Group