पनवेल (Pclive7.com):- खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या काही श्री सदस्यांना उष्माघातामुळे रुग्णालयात हलवावे लागले. यामध्ये अकरा जणांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. राज्य शासनातर्फे मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येणार असून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांचा उपचाराचा खर्च शासनामार्फत केला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

एकूण ११ मृतदेह उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथे आणले आहेत. त्यापैकी एका मृतदेहाची (महिला) ओळख पटलेली नाही. विरार, जव्हार, सोलापूर आणि मंगळवेढा येथील मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. अजुन ३ व्यक्ती बेपत्ता असून, त्यांचा शोध लागलेला नाही. दरम्यान ३८ लोक अजूनही रुग्णालयात दाखल असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

एकूण ३८ जणांना दाखल केले होते. त्यापैकी त्यापैकी ११ मृत झाले असून, ८ जणांना डिसचार्ज देण्यात आला आहे.






















Join Our Whatsapp Group