वर्धापनदिनानिमित्त खरेदीवर २५% कॅशबॅकची खास सूट..!
पिंपरी (Pclive7.com):- आमच्या ग्राहकांच्या अजोड विश्वासासोबत, दागिन्यांची असंख्य विविधता, कारागिरी आणि ग्राहकांच्या पसंतीसोबत आणि आपल्या सर्वांच्या हृदयात स्थान मिळवलेलया आमच्या नम्र ग्राहक सेवेसोबत आम्ही सत्यम ज्वेलर्स, आपणा सर्वांसोबत सत्यम ज्वेलर्सचा ४० वा वर्धापनदिन साजरा करीत आहोत याचा आम्हांला अत्यंतिक आनंद होत आहे.

सत्यम ज्वेलर्स म्हणजे आपल्या पिंपरी-चिंचवड परिसरातील ४० वर्षांपासून ग्राहकांचा विश्वास खऱ्या अर्थाने मिळवणारी पेढी. ग्राहक आम्हां सत्यम ज्वेलर्सकडे फक्त सोने खरेदी करण्याचं ठिकाण म्हणून कधीही बघत नाहीत, तर आपल्या आयुष्याच्या चढ-उतारात, गोड-सुखी क्षणांत सत्यम ज्वेलर्सला आपला सोबती मानतात आणि आम्हीही ग्राहकांच्या विश्वासाला कधी तडा जाऊ देत नाही. आम्हां सत्यम ज्वेलर्सकडे पिढ्यान-पिढयांचा ग्राहकवर्ग आहे. ७० वर्षांच्या आजी-आजोबांपासून २५ वर्षांच्या तरुणाईपर्यंत सगळ्यांना एका धाग्यात बांधण्याचं श्रेय जाते ते आमच्या “टीम सत्यम”ला.

४० व्या वर्धापनदिनानिमित्त सत्यम ज्वेलर्स सादर करीत आहे खरेदीवर २५% कॅशबॅकची खास सूट. ह्या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आम्ही आपणां सर्वांना आमंत्रित करतो. ह्या ऑफरद्वारे आपण पारंपरिक चपलाहार, कोल्हापुरी साज, ठुशी अश्या मराठमोळ्या दागिन्यांच्या बरोबरीनेच आधुनिक दागिन्यांमधील छोटे मंगळसूत्र, नवजात मुला-मुलींचे दागिने ते वधू-वरांचा साखरपुडा किंवा लग्नापर्यंतच्या भरजरी दागिन्यांची असणारी विविध डिझाइन्समधील दागिने आपण मनसोक्त खरेदी करू शकता.

एवढंच नाही तर भारताच्या विविध राज्यांमधली कलात्मकता लक्षात घेऊन पोलकी, जडाऊ, अँटिक, कुंदन, ह्या व अश्या अनेक दागिन्यांची कलाकृतीही आपल्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे.

गेली ४० वर्षे आम्हाला आपली सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल सत्यम ज्वेलर्स आमच्या असंख्य ग्राहकांचे अनेक आभार आणि अभिनंदन! लवकरच सत्यम ज्वेलर्सला भेट द्या आणि आमच्या आनंदांत सामील व्हा..!






















Join Our Whatsapp Group