मुंबई (Pclive7.com):- राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला असून अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आज रविवारी, सकाळपासूनच राजभवनात हालचाल सुरू होती. त्यामुळे अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करून सरकारमध्ये दाखल होण्याच्या चर्चा होत्या. या चर्चा आता संपल्या असून अजित पवार सरकारमध्ये सामील झाले आहेत.

आज सकाळपासूनच राज्यातील राजकारणात भूकंपसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. राष्ट्रवादीचे अनेक आमदार राजभवनात दाखल झाले होते. अजित पवार सरकारमध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. परंतु, सरकारकडून याबाबत काहीच अधिकृत खुलासा करण्यात आला नव्हता. अखेर, आज दुपारीच काही वेळापूर्व राजभवनात शपथविधी सोहळा झाला. यावेळी अजित पवारांनी राज्याच्या उपुख्यमंत्री पदाची शपथ घेत असल्याचं जाहीर केलं. “मी अजित पवार, महाराष्ट्राच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो”, असं अजित पवार म्हणाले.





















Join Our Whatsapp Group