मुंबई (Pclive7.com):- उद्धव ठाकरे यांना एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलम गोऱ्हे यांनी हा पक्षप्रवेश केला आहे.

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना योग्य मार्गाने जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिला आहे की एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाच अधिकृत आहे.
दरम्यान, काही दिवसांपुर्वीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी प्रवेश केला होता. तसेच माजी नगरसेवक अमेय घोले, मनिषा कायंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.






















Join Our Whatsapp Group