पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने भव्य 6-A फुटबॉल स्पर्धा चिंचवड (सॉकर यार्ड) येथे ३० जून ते २ जुलै मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे हे पहिले पर्व होते. यामध्ये पिंपरी चिंचवड तसेच पुण्यातील २६ टिम नी सहभाग घेतला होता. यामध्ये पन्ना क्लबनी प्रथम क्रमांकाचे बक्षिस जिंकले. त्यांना रोख पारितोषिक २२,२२२/- व ट्राॅफी देण्यात आली. त्यानंतर दुसरे पारीतोषिक बीएचएफसीनी जिंकले. त्यांना रोख पारितोषिक ११,१११/- व ट्राॅफी देण्यात आली.
या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमाला महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमितजी राजसाहेब ठाकरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विजेत्या संघाना ट्राॅफी देऊन अमितजींनी टिमचे कौतुक केले व शुभेच्छा दिल्या. अमितजी ठाकरे हे स्वतः एक फुटबॉल खेळाडू आहेत. त्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला वेळ काढून येण्याची पसंती दर्शवली. पिंपरी चिंचवड शहरातील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या कामाचे अमितजी ठाकरे यांनी कौतुक केले व पुढील काळातही अशाच प्रकारे कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचे आश्वासान दिले.
यावेळी अमित ठाकरे साहेबांचा सन्मानचिन्ह देऊन विद्यार्थी सेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मनविसे सरचिटणीस मनसे प्रवक्ते गजाननजी काळे, पिंपरी चिंचवड शहराचे नेते राहुलदादा कलाटे, मनविसे सचिव आशिषजी साबळे पाटील, मनसे शहर अध्यक्ष सचिन चिखले व शहरातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
या स्पर्धेचे आयोजन मनविसे प्रदेश उपाध्यक्ष हेमंत महादेव डांगे, शहराध्यक्ष अनिकेत प्रभु यांनी केले होते. तसेच उपशहराध्यक्ष ओंकार पाटोळे, विकास कदम, प्रतिक शिंदे, सिध्देश सोनकवडे, आकाश लांडगे, सचिव अक्षय नाळे, विभाग अध्यक्ष सुमिम कलापुरे, मयुर हजारे, आकाश पांचाळ, विभाग सचिव शरण्य पाटणे, किरण पाटील, अक्षय खामकर, उपविभाग अध्यक्ष शंतनु तेलंग, ओंकार रेनुसे, सुशिल पोतदार, महेश बडगुजर, यश कुदळे यांनी नियोजन केले होते. यावेळी हेमंत डांगे यांनी कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार मानले व सर्व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.