पिंपरी (Pclive7.com):- एनआरबीआर कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट येथे वृक्षारोपण व पर्यावरणविषयक जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नोवेल ग्रूपचे संस्थापक-अध्यक्ष व भाजपाचे राज्य सचिव श्री. अमित गोरखे यांचे वडील स्वर्गीय श्री. गणपतराव गोरखे यांच्या ११ व्या पुण्यस्मरण दिनाचे आणि राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या ५३ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष श्री. शंकरभाऊ जगताप, मा. खासदार श्री. अमर साबळे, पिंपरी विधानपरिषदेच्या आमदार सौ. उमाताई खापरे, श्री. सदाशिव खाडे, मा. महापौर श्रीमती माई ढोरे, नगरसेविका श्रीमती अनुराधाताई गोरखे, श्री. केशव घोळवे, श्री. राजू दुर्गे, भाजपा महिला मोर्चा अध्यक्ष सौ. उज्वला गावडे, उपाध्यक्ष सौ. नंदा करे आणि शहर भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

या उपक्रमाच्या माध्यमातून संस्थेच्या विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व तसेच पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष संवर्धन किती गरजेचे आहे हे सांगण्यात आले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वैभव फंड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले व आभार मानले.






















Join Our Whatsapp Group