पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड महापालिकेतील पात्र असलेल्या अधिकाऱ्यांना पदोन्नती द्यावी अशी मागणी युवासेनेचे निलेश हाके यांनी केली आहे. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांना याबाबत निवेदन देण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक राजू बनसोडे उपस्थित होते.
हाके यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शासकीय आदेशानुसार आसाम यूनिवर्सिटी ही पदोन्नतीसाठी ग्राह्य आहे. तरी महानगरपालिकेच्या वतीने शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत कुठल्याही प्रकारचे अद्याप पदोन्नती झालेली नाही. व UGC ने जाहीर केलेल्या १९९४ ते २०२२ च्या जाहीर केलेल्या परिपत्रकामध्ये कुठेही आसाम यूनिवर्सिटीचा समावेश नाही.
तरी आपल्या या निर्णयामुळे अनेक पदोन्नतीसाठी पात्र असलेले अधिकारी वंचित आहेत. प्रशासनाकडून जाणीवपूर्वक त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत आहे. तरी सदर प्रकरणी सहानुभूतीपूर्वक विचार करावा. आसाम यूनिवर्सिटीतून पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या अधिकाऱ्यांना त्वरित पदोन्नती द्यावी. अन्यथा त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर न्यायालयीन लढाई सुरू केली जाईल, असा इशारा निलेश हाके यांनी दिला आहे.