पिंपरी (Pclive7.com):- स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवमध्ये नागरिकांनी हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत घरावर तिरंगा ध्वज फडकवून मोहिमेत सहभाग घेतला. या मोहिमेनंतर ध्वजसंहितेचे पालन होणेही तितकेच आवश्यक आहे. घरावर तिरंगा ध्वज अद्यापही लावलेला असल्यास नागरिकांनी तो व्यवस्थित उतरवून ठेवावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वर्षपूर्तीनिमित्त विविध कार्यक्रम देशात सर्वत्र मोठ्या उत्साहात राबविण्यात आले. या कार्यक्रमांतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत शहरातील नागरिकांनी हर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत घरावर तिरंगा ध्वज फडकवून मोहिमेत सहभाग घेतला होता.

या मोहिमेनंतर ध्वजसंहितेचे पालन होणेही तितकेच आवश्यक आहे. त्यामुळे घरावर तिरंगा ध्वज अद्यापही लावलेला असल्यास नागरिकांनी तो व्यवस्थित रित्या त्वरित उतरवून ठेवावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. याबाबत क्षेत्रीय कार्यालयांतर्गत पाहणी करण्यात येणार आहे.






















Join Our Whatsapp Group