देहूरोड (Pclive7.com):- पिंपरी चिंचवडलगतच्या देहूरोडमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दहावीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. रेल्वेसमोर येऊन त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. बुधवारी ३० ऑगस्टच्या रात्री सव्वा दहाच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्येपूर्वी त्याने मित्राला मोबाईलवर मेसेज पाठवत आपण आत्महत्या करत असल्याचं कळवलं अन त्यानंतर तासाभरात त्याचा मृतदेह लोहमार्गालगत आढळला. आत्महत्येचं मूळ कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे.

देव कुमार असं या पंधरा वर्षीय मुलाचं नाव होतं. तो देहूरोडच्या लष्करातील एएसआय अधिकाऱ्याचा मुलगा होता. देवला मोबाईल गेमिंगचा ही छंद होता, त्यातून तो अनेक चॅलेंज ही स्वीकारायचं अशी माहिती त्याच्या मोठ्या भावाने रेल्वे पोलिसांना दिली.
देव कुमारचं कुटुंब हे मूळचं मथुरा येथील आहे. त्याची आई कामानिमित्त मथुऱ्याला गेली होती, वडील ड्युटीवर होते. तर दोन्ही भाऊ घरात होते. त्यावेळी देवने मित्राला आत्महत्या करत असल्याचा मेसेज केला अन् पुढच्या तासाभरात त्याने लोहमार्ग गाठलं. धावत्या रेल्वेसमोर येऊन त्याने जीव दिला. देवने आत्महत्या का केली, याचं मूळ कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्या कारणाचा शोध रेल्वे पोलीस घेत आहेत. रेल्वे पोलिसांनी देवचा मृतदेह कुटुंबीयांकडे दिल्यानंतर ते पुढील विधींसाठी मथुऱ्याला गेले आहेत.






















Join Our Whatsapp Group