पिंपरी (Pclive7.com):- आज दि.१ सप्टेंबर रोजी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरून प्रवास करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक महत्वाची बातमी आहे. आज पुणे-मुंबई द्रुतगती मार्ग वाहतुकीसाठी दोन तास बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्याने दिली आहे.
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर आज सीसीटीव्ही बसवण्यासाठी प्रोव्हिजन केली जाणार आहे. यासाठी आज द्रुतगती मार्गावर दुपारी १२ ते २ असा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे.
या दोन तासांत ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली जाईल. याच गॅन्ट्रीवर पुढच्या काळात सीसीटीव्ही बसविले जातील. हेच सीसीटीव्ही अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या आणि वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर नजर ठेवतील. अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली.
पर्यायी मार्ग कोणते?
मुंबईवरून पुण्याला येणाऱ्या लेनवर लोणावळा एक्झिट जवळ गॅन्ट्री बसविण्यात येईल. या दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई-महामार्गाकडे हलकी वाहतूक वळवली जाणार आहे. तर खालापूर टोल नाक्यावर अवजड वाहतूक थांबवली जाणार आहेत.
Tags: पुणे मुंबई एक्स्प्रेस वे