पिंपरी (Pclive7.com):- कालपासून पवना धरण क्षेत्रात पावसाने पुन्हा आगमन केले आहे. दरम्यान पवना धरण १०० टक्के भरले असून आज (दि.०८) सकाळी ८ वाजता धरणातून ३५०० क्यूसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे. त्यामुळे नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे.

प्रशासनाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पवना धरण १०० टक्के क्षमतेने भरलेले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पाऊसचा जोर लक्षात घेता विज निर्मिती ग्रुहद्वारे पवना नदी मध्ये सकाळी ६ वाजता १४०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात आलेला आहे. धरण क्षेत्रात पावसाचे प्रमाण पाहता व येव्यानूसार सकाळी ८ वाजता पवना धरणाच्या सांडव्यावरून २१०० क्यूसेक्स असे ऐकुण ३५०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात येणार आहे.
तरी पवना नदी काठच्या सर्व नागरीकांना सूचित करण्यात येते की, कृपया नदीपात्रात कोणीही उतरू नये आणि नदी मधील पाण्याचे पंप, नदी काठचे शेती अवजारे व तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. कृपया सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात व सर्वांनी योग्य ती दक्षता घ्यावी व पाटबंधारे विभागास सहकार्य करावे असे आवाहन पवना धरण पूरनियंत्रण कक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.
Tags: नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारापवना धरणपवना धरण १०० टक्के भरलेपवना नदीपिंपरी चिंचवडमावळ






















Join Our Whatsapp Group