पिंपरी (Pclive7.com):- स्थूलत्व व मधुमेहमुक्त विश्व अभियानाचे प्रेरणास्थान डाॅ.श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्त डाॅ.जगन्नाथ दीक्षित यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवडमध्ये १७ ठिकाणी वाॅकेथाॅनचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती असोसिएशन फाॅर डायबेटीस अॅन्ड ओबेसिटी रिव्हर्सल (अडोर ट्रस्ट) च्या विश्वस्त डाॅ. वेदा नलावडे यांनी दिली.

रविवारी दि.१० सप्टेंबर रोजी सकाळी ६ ते ९ या वेळेत जगभरातील विविध २५० ठिकाणी ५ किलोमीटर चालण्याचा विश्वविक्रम होणार आहे. या उपक्रमात हजारो लोक सहभागी होणार आहेत. या माध्यमातून डाॅ. दीक्षित जीवनशैली पिंपरी-चिंचवडमधील जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचवण्याचा उद्देश आहे असे अभियानाचे समन्वयक डाॅ.संतोष ढुमणे, प्रा.दीपक येवले व प्रीतम वाघमैतर यांनी दिली.
ज्यांना या पाच किलोमीटर चालण्याच्या उपक्रमात सहभाग घ्यायचा आहे त्यांनी विवेक कुलकर्णी यांना 9420154742 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन विश्वस्त डाॅ.वेदा नलावडे यांनी केले आहे.






















Join Our Whatsapp Group