मोरगाव (Pclive7.com):- तब्बल ५२५ वर्षांची परंपरा लाभलेली, चिंचवड येथील श्रीमन् महासाधू मोरया गोसावी महाराज प्राप्त श्री मंगलमूर्तींची भाद्रपद पालखी मोरगाव येथे असताना, भाद्रपद शुद्ध पंचमीच्या मंगल दिनाचे औचित्य साधून चिंचवड देवस्थानच्या नवीन वेबसाईटचे अनावरण करण्यात आले. त्यावेळी देवस्थानचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव, विश्वस्त श्री आनंद विश्वनाथ तांबे व श्री विनोद पवार, देवस्थानचे कारभारी श्री किशोर जोशी, वेबसाईट डेव्हलप केलेले पिक्सेल न पेपर चे श्री श्रेयस पाटील व सायली खेडकर, तसेच श्री स्वप्नील देव, श्री वरद देव व श्री हर्षद जोशी व अन्य मान्यवर उपस्थित होते. पंचक्रोशीतील अनेक मोरया भक्त देखील हा सोहळा पाहण्यासाठी उपस्थित होते.

चिंचवड देवस्थानच्या अधिपत्याखाली अष्टविनायकातील श्री क्षेत्र मोरगाव येथील श्री मयुरेश्वर मंदिर, श्री क्षेत्र थेऊर येथील श्री चिंतामणी मंदिर, श्री क्षेत्र सिद्धटेक येथील श्री सिद्धिविनायक मंदिर तसेच श्री क्षेत्र चिंचवड येथील श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर व श्री मंगलमूर्ती वाडा, नारंगी येथील श्री मोरया गोसावी महाराज मंदिर ही मंदिरे आहेत.
चिंचवड, मोरगाव, थेऊर, सिद्धटेक व नारंगी या सर्व स्थानांचे वैशिष्ट्य दर्शवणारी तसेच या क्षेत्रांची महती सर्वांपर्यंत पोहोचवणारी वेबसाईट तयार करण्याची अनेक वर्षांपासूनची एक इच्छा आज श्री मयुरेश्वराच्या सानिध्यात पूर्ण होताना देवस्थानच्या सर्व विश्वस्तांना अत्यंत आनंद होत आहे. अशी माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त श्री मंदार महाराज देव यांनी दिली.
सर्वाद्य क्षेत्र मोरगाव, श्री क्षेत्र थेऊर, श्री क्षेत्र सिद्धटेक व चिंचवड येथील श्रीमन् महसाधू श्री मोरया गोसावी महाराज यांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करणारी ही वेबसाईट डेव्हलप करण्याची संधी आम्हाला मिळाली हे आम्ही आमचे भाग्य समजतो, व हे कार्य करण्याची संधी दिल्याबद्दल देवस्थानच्या विश्वस्त मंडळाचे आभार मानतो. अशी माहिती पिक्सेल न पेपर चे श्री श्रेयस पाटील व सायली खेडकर यांनी दिली.
सर्व अनेक भाविकांनी या वेबसाईटच्या माध्यमातून देवस्थानचे विविध उपक्रम तसेच या सर्व स्थानांची माहितीचा लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त श्री विनोद पवार व श्री आनंद तांबे यांनी केले.
वेबसाईट पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा..
Tags: चिंचवड देवस्थानचिंचवड देवस्थानची वेबसाईट आता नवीन स्वरूपातमोरया गोसावीमोरया गोसावी देवस्थानवेबसाईट आता नवीन स्वरूपात





















Join Our Whatsapp Group