
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय कुरुंदवाडे हे आळंदी फाटा येथील वर्कशॉपमधून एकता नगरच्या दिशेने निघाले. त्यांना पाच ते सहा जणांच्या टोळक्याने त्यांची गाडी अडवली. त्यांनाच तुम्ही माझ्या गाडीला धडक दिली असं म्हणत अरेरावी केली. माझी गाडी दुरुस्त करून द्या, असं म्हणत त्यांना बळजबरीने रिक्षात बसवले आणि खेड परिसरातील पाईट या ठिकाणी निर्जनस्थळी नेऊन तू व्यवसायिक आहेस तू आम्हाला एक कोटी दे, तसं न केल्यास आम्ही तुझ्या घरच्यांचा गेम करू असं म्हणत धारदार शस्त्र दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. घाबरलेल्या संजय कुरुंदवाडे यांनी ही बाब कोणाला सांगितली नाही.
दुसऱ्याच दिवशी ठरल्याप्रमाणे बारा लाख रुपयांची सोय केली का? म्हणून आरोपींचा फोन आला. यामुळे ते आणखी घाबरले. शिवाय, आरोपी हे वेगवेगळ्या नंबर वरून फोन करत होते. खंडणीसाठी वारंवार येत असलेल्या फोनमुळे संजय हे देखील त्रस्त झाले होते. अखेर ही बाब नातेवाईक आणि मित्रांना सांगितल्यानंतर त्यांनी चाकण पोलिसात तक्रार द्यायची ठरवली. खंडणीसाठी आरोपींचा फोन आला आणि संबंधित रक्कम ही नाणेकरवाडी या ठिकाणी असलेल्या एटीएमच्या शेजारी कचऱ्याच्या डब्यात पैशाची बॅग ठेवण्यास सांगितली. पोलिसांनी देखील सापळा रचला आणि पैसे घेण्यास आलेल्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना बेड्या ठोकल्या असून दोन जण फरार आहेत. त्यांचा शोध चाकण पोलीस घेत आहेत. ही कामगिरी चाकण पोलिसांनी केली आहे.






















Join Our Whatsapp Group