पिंपरी (Pclive7.com):- मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पाठिंबा भेटत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आळंदी दिघी रस्त्यावर टायर जाळून रस्ता अडवण्यात आला आहे.

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलनाचे जाळपोळच लोण आता पिंपरी- चिंचवडपर्यंत पोहचल आहे. आळंदी दिघी मॅग्जीन चौकाच्या दरम्यान रस्त्यावर टायर जाळून मराठा समाजाचे तरुण आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारच्या विरोधात तरुणांनी रोष व्यक्त केला आहे. एक- मराठा लाख मराठा अशा घोषणा देऊन रस्त्यावर टायर जाळण्यात आले आहेत.
हा रस्ता काही वेळ अडवण्यात आला होता. मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक असल्याचं बघायला मिळत आहे. रस्त्यावर टायर जाळल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू आहे.






















Join Our Whatsapp Group