पिंपरी (Pclive7.com):- शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त फुगेवाडी येथे शिवसेना – युवासेनेच्या वतीने सालाबादप्रमाणे यंदाही सार्वजनिक नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. अतिशय उत्साहाच्या वातावरणात नवरात्रीच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी दापोडी, फुगेवाडीतील माताभगिनींच्या हस्ते देवीची आरती करण्यात आली. तिसऱ्या दिवशी नादब्रह्म भजनी मंडळाच्या भजनाने सर्वजण मंत्रमुग्ध झाले.
चौथ्या दिवशी बाल चिमुकल्यांसाठी बाल जत्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये चिमुकल्यांना खेळ, खाऊ याचबरोबर बालजत्रेत आनंद घेता आला. पाचव्या दिवशी महिलांसाठी खास बाईपण भारी देवा या कार्यक्रमातून महिलांसाठी मार्गदर्शनपर नाट्य, गाणी, गप्पा पहावयास मिळाले. सहाव्या दिवशी फुगेवाडीत चक्क बाॅलीवूडच अवतरले होते, हुबेहुब दिसणार्या नकली सिनेतारकांनी नृत्य व अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकली. सातवा दिवस महाराष्ट्राची लोकधारा या मराठमोळ्या कार्यक्रमाने पार पडला. आठव्या दिवशी महिलांना एक दिवस मुक्तपणे आनंद व्यक्त करत खेळ गाणी गप्पा खेळता यावी संकल्पनेतून होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प्रथम क्रमांकास ऍक्टिव्हा दुचाकीच्या सौ.वंदना बसवंत मानकरी ठरल्या. द्वितीय क्रमांक एलईडी टीव्हीच्या सौ.कोमल पाटोळे मानकरी ठरल्या. व तृतीय क्रमांक काचेची गॅस शेगडीच्या सौ.बोंबले मानकरी ठरल्या. या कार्यक्रमात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नवरात्रीच्या नवव्या दिवसाची सांगता महात्मा बसवेश्वर महाराज मित्र मंडळ कर्नाटक यांच्या समाजप्रबोधनपर भजनाने झाली.
या नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध क्षेत्रातील कर्तबगार व्यक्तींचा युवासेना समाजरत्न पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यात राजेश वाबळे (वैद्यकीय अधीक्षक), भास्कर जाधव (CID सहाय्यक पो. आयुक्त श), विजयकुमार खोराटे (अतिरिक्त आयुक्त PCMC), विठ्ठल जोशी (सहाय्यक आयुक्त प्रशासन PCMC), गोविंद वाकडे (पत्रकार), एस.बी.पाटीलसाहेब (उद्योजक), वैशाली लगाडे (माहिती अधिकारी कल्याणकारी योजना), राजाभाऊ बनसोडे (नगरसेवक सामाजिक क्षेत्र) यांच्या कार्याची दखल घेत समाजरत्न पुरस्काराने सन्मानचिन्ह देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
या नवरात्र उत्सव महोत्सवानिमित्त प्रामुख्याने संसदरत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, पुणे व मावळ युवासेना प्रमुख विश्वजीत बारणे, महिला शहरसंघटिका सरिता ताई साने उपस्थित होते. उत्सवाचे मुख्य आयोजक युवा अधिकारी युवासेना पिंपरी विधानसभा निलेश हाके यांच्या नवरात्रोत्सवतील नवरंगी कार्यक्रमाचे फुगेवाडी, दापोडीतील महिलांसह सर्वच नागरिकांकडून कौतुक होत आहे.