पिंपरी चिंचवडमध्ये राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या निवड चाचणीत यश; महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या नियंत्रणाखाली भोसरीत स्पर्धा
पिंपरी (Pclive7.com):- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने धाराशिव येथे ६५ वी महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा पार पडणार आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद यांच्या निरीक्षणखाली पिंपरी-चिंचवड येथे त्यासाठी निवड चाचणी कुस्ती स्पर्धा घेण्यात आली. पै. बाळासाहेब रामचंद्र लांडगे (वस्ताद) यांच्या ६९ वा वाढदिवसानिमित्ताने या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत ८१ खेळाडूंनी सहभाग घेतला. या मध्ये प्रसाद सस्ते हा महा केसरीचे मानकरी ठरला.
पै. नितिन बाळासाहेब लांडगे, महेशदादा स्पोर्टस फाऊंडेशन, भवानी तालीमच्या वतीने याचे संयोजन करण्यात आले. पैलवान मारुती रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुल भोसरी येथे या स्पर्धा पार पडल्या. पैलवान किसन शंकर लांडगे यांच्या हस्ते उदघाटन झाले. आमदार महेश किसन लांडगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक लक्ष्मण सस्ते, सागर गवळी, संतोष लोंढे, नंदकुमार लांडे, दत्ता गव्हाणे, दामोदर फुगे, मदन गव्हाणे, गणपत गव्हाणे, रंगनाथ फुगे, शिवाजी गव्हाणे, भगवान लोंढे, राजाराम फुगे, महाराज सोपान फुगे, बाळासाहेब गवळी, राजेंद्र लांडगे, विजय लांडगे,’ मारुती लांडगे, शिवाजी लांडगे, ‘ पै. विनय लांडगे, पै. बाबा तांबे, माऊली कुटे’, पंडित मोकाशी-बोराडे, बबन बोऱ्हाडे, योगेश लांडगे, तुळशिराम लोंढे, सुरेश लोंढे, हिरामण लांडगे, अनिल फूगे, सतीश गावडे, अनिल लोंढे, पप्पु काळभोर, ज्योती बारणे, भाऊसाहेब लांडे, कैलास माने, देवा माने, रतन लांडगे, लाला लांडगे, अंकुश लोंढे, किशोर नखाते आदींसह भोसरीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
नितिन लांडगे, नारायण लांडगे, विष्णु लांडगे, अजय लांडगे, स्वप्नील लांडगे, गणेश लांडगे, संतोष लांडगे महाराज, कालिदास लांडगे, राहुल गवळी, रूपेश जाधव आदींनी या निवड चाचणी स्पर्धेचे संयोजन केले. चंद्रकांत मोहोळ, रोहिदास आमले, निलेश मारणे यांनी पंच म्हणून काम पाहिले. महाराष्ट्र चॅम्पियन पुणे पोलीस पैलवान स्वप्नील लांडगे यांनी सर्व कुस्तीपटू व वस्ताद यांचे आभार मानले.
स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे –
गादी विभागात – 57 किलो वजनी गटात प्रणव सस्ते, सुयस दास यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. 61 किलो वजनी गटात योगेश तापावर, प्रथमेश पाटील यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. 65 किलो वजनी गटात महेश जाधव, राहुल माने यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. 70 किलो वजनी गटात परशुराम कँप, स्वप्निल सुकुंडे यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. 74 किलो वजनी गटात दिग्विजय काळे, अजिंक्य सांडभोर यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. 79 किलो वजनी गटात पवन माने याला प्रथम क्रमांक प्राप्त झाला. 86 किलो वजनी गटात सौरभ शिंगाडे, यश भोखे यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. 92 किलो वजनी गटात सौरभ जाधव, निरंजन बालवडकर यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक मिळाला. 97 किलो मध्ये शुभम गवळी याला प्रथम तर रणजीत मोकाशी याला द्वितीय क्रमांक मिळाला.
माती विभागात – 57 किलो मध्ये श्री जाधव, महेश सलगर यांना यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. 61 किलो वजनी गटात अजिंक्य माचुडे रुद्र वाळुंजकर यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. 65 किलो मध्ये संकेत माने प्रथम तर अमित म्हस्के म्हस्के याला द्वितीय क्रमांक मिळाला. 70 किलो मध्ये किरण तळेकर, जय वाळके यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. ७४ किलो मध्ये रवींद्र गोरेड कर्तिक फुगे यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. 79 किलो मध्ये अनिकेत लांडे प्रथम तर पृथ्वीराज जाधव याला द्वितीय क्रमांक मिळाला. ८६ किलो वजनी गटात यशराज अमराळे, विशाल कोळी यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. ९२ किलो मध्ये विवेक शेलार, पवन चव्हाण यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. ९७ किलो वजनी गटात तेजस फेंगसे, यश नखाते यांना अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांक प्राप्त झाला.