पिंपरी (Pclive7.com):- मुळशी तालुक्यातील पुणे-कोलाड महामार्गावर एक भीषण अपघात झाला असून एका भरधाव टेम्पोने सातवाहनांना धडक दिली. यामध्ये सात नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. अंगावर शहारे आणणाऱ्या या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार आहेत.
याप्रकरणी पौड पोलिसांनी टेम्पो चालक गोविंद भालचंद्र लाल याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रविवारी दुपारी हा अपघात घडला होता. गोविंद लाल हा पुणे महामार्गावरून मुळशी तालुक्यातील पिरंगुट घाट उतारावर भरधाव वेगात निघाला होता. त्या ट्रकमध्ये सिमेंटच्या विटा होत्या. त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ही ट्रक रस्त्यावर भरधाव वेगात आला. या अपघातात पाच दुचाकी आणि एका चार चाकी वाहनाचे नुकसान झाले. जखमींमध्ये एका डॉक्टरचा समावेश आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.