पिंपरी (Pclive7.com):- भाजप नगरसेवक तुषार कामठे यांच्या पुढाकाराने पिंपळे निलख – वाकड रोड ‘पोस्टरमुक्त’ करण्यात आला आहे. येथील संपूर्ण रोडवरील पथ दिव्यांच्या खांबावर बेकायदा पोस्टर लावण्यात आले होते. स्वत: तुषार कामठे यांनी अतिक्रमन मोहिमेत सहभागी होत हा रस्ता ‘पोस्टरमुक्त’ केला.
पिंपळे निलख आणि वाकड परिसराची झपाट्याने वाढ होत आहे. त्यापुढेच असणार्या हिंजवडी आयटी पार्कमुळे येथील मुख्य रस्त्यांवर कायम मोठी वर्दळ असते. या रस्त्यावरील पथदिव्यांच्या खांबावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरमुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर अपुरा प्रकाश पडत होता. तसेच वाहनचालकांना वाहन वळविताना अडथळा होत होता. या पोस्टरमुळे प्रभागाचे विद्रुपीकरण झाले होते. याबाबतची तक्रार पिंपरी चिंचवड गृहनिर्माण संस्था महासंघाच्या सदस्यांनी स्थानिक नगरसेवक तुषार कामठे यांच्याकडे केली होती. त्यानुसार कामठे यांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पोस्टर काढण्याच्या सुचना केल्या होत्या. तसेच पत्रव्यवहार देखील केला होता. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे अर्थपूर्ण कानाडोळ करत कारवाईत दिरंगाई केली होती. त्यामुळे नगरसेवक तुषार कामठे यांनी स्वत:च हे अनधिकृत पोस्टर काढण्याचा निर्णय केला. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे पथक स्थापन करुन वाकड रोडवरील बेकायदा पोस्टर काढुन घेतले व वाकड रोड पोस्टरमुक्त केला. तसेच काढण्यात आलेले पोस्टर “ड” क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वासमोर टाकुन महापालिका प्रशासनाचा निषेध केला.






















Join Our Whatsapp Group