पिंपरी (Pclive7.com):- पार्क केलेल्या ट्रेलरच्या टाकीतून चोरट्यांनी तब्बल २८० लिटरचे डिझेल चोरून नेले. ही घटना बुधवारी (दि.२०) कातवी येथील श्रीनीवास सर्विस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी येथे उघडकीस आली आहे.
या प्रकरणी तोहद राजू शेख (२४, रा. वाळे, मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात इसमावर गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी यांनी त्यांचा ट्रेलर कातवी येथे पार्क केला होता. यावेळी चोरट्याने ट्रेलरच्या फ्युअल टँकमधून २५ हजार ९४९ रुपयांचे २८० लिटर डिझेल चोरले आहे.
























Join Our Whatsapp Group