पिंपरी (Pclive7.com):- विश्वकर्मा सुतार समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा रविवार दि.२४ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता आळंदी देवाची (पुणे) येथे होत आहे. या मेळाव्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, उद्योगमंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, तसेच समाजाचे आमदार डॉ. संजय रायमुलकर (मेहकर), दिव्यांग कल्याण समितीचे प्रमुख आमदार बच्चू कडू, आमदार महेश लांडगे, आमदार दिलीप मोहिते पाटील हे उपस्थित राहणार आहेत.
फ्रूटवाले धर्मशाळा, प्रदक्षिणा रोड आळंदी येथे हा महामेळावा होणार आहे. यवतमाळ जिल्ह्यातील सुतार समाज बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन विश्वकर्मीय सुतार समाज मुख्य प्रशासकीय राज्य समन्वयक प्रा. विद्यानंद मानकर यांनी केले आहे.