पिंपरी (Pclive7.com):- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांची पदयात्रा पिंपरी चिंचवड शहरात दाखल झाली आहे. रक्षक चौकात रात्री ११.१५ वाजता मनोज जरांगे पाटील हे दाखल झाले असून लाखो आंदोलक त्यांच्या सोबत आहेत. तसेच हजारोंच्या संख्येने त्यांच्या सोबत गाड्या देखील आहेत. त्यांना समर्थन देण्यासाठी लाखोंची गर्दी उसळली आहे. तब्बल बारा तासांचा प्रतिक्षेनंतरही समर्थकांमध्ये तोच उत्साह पाहायला मिळत आहे.
पिंपरी चिंचवड शहर जरांगे पाटील यांचे स्वागत करण्यास सकाळी ९ वाजल्यापासून सज्ज होते. अखेर रात्री ११.१५ वाजता जरांगे पाटील पिंपरी चिंचवडमध्ये दाखल झाले आहेत. रक्षक चौकात त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. जेसिबितून त्यांच्यावर यावेळी फुलांची उधळण करण्यात आली. एक मराठा लाख मराठा.. मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे.. आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे.. अश्या जोरदार घोषणा यावेळी देण्यात येत होत्या..
























Join Our Whatsapp Group