मोहननगर, काळभोरनगर परिसरातील ४५० हून अधिक नागरिकांनी घेतला सुविधेचा लाभ
पिंपरी (Pclive7.com):- माजी नगरसेविका मीनल विशाल यादव यांच्या वाढदिवसानिमित्त मोहन नगर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात दि.३० जून ते १ जुलै दरम्यान एसटी स्मार्ट कार्ड (NCMC) नोंदणी व वितरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून मोहननगर, काळभोरनगर, रामनगर परिसरातील ४५० हून अधिक नागरिकांनी सहभाग नोंदवून या सुविधेचा लाभ घेतला.

प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करण्यासाठी स्मार्ट कार्ड आवश्यक असल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणात शिबिरात उपस्थिती दर्शविली. ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विविध घटकांतील नागरिकांनी कार्ड नोंदणी करून घेतली.
या शिबिराचे उद्घाटन उपमहापौर शर्मिला बाबर, क्रीडा सभापती कैलास कुटे आणि भाजप सरचिटणीस वैशाली खाडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय जगताप, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष कमलेश मुथा, नागेश नामदे, अशोक काशीद, ज्येष्ठ नागरिक तसेच परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना उपस्थित मान्यवरांनी नागरिकांसाठी उपयुक्त अशा सेवा व शासकीय योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले. वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे परिसरातील नागरिकांनी स्वागत केले.




















Join Our Whatsapp Group