पिंपरी (Pclive7.com):- मंडप व्यवसायाशी संबंधित व्यावसायिकांना एकाच व्यासपीठावर आणण्यासाठी मंडप ओनर्स वेलफेअर असोसिएशन, पिंपरी-चिंचवड, पुणे जिल्हा यांच्या वतीने ८ व्या वर्धापन दिनानिमित्त भव्य प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ५, ६ आणि ७ जुलै २०२६ रोजी पुनावळे येथील मथुरा लॉन्स, संत तुकाराम महाराज ब्रिजजवळ येथे पार पडणार आहे.

या प्रदर्शनात मंडप, डेकोरेशन, केटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट आणि संबंधित व्यवसायांशी निगडित विविध उत्पादने व सेवांचे प्रदर्शन होणार आहे. आयोजकांच्या माहितीनुसार, ४५ हून अधिक प्रीमियम स्टॉल्स, २५ हजार चौरस फूट प्रदर्शन हॉल तसेच आकर्षक ऑफर्सची सुविधा उपलब्ध असणार आहे. विशेष म्हणजे सर्वांसाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आला आहे.

या महोत्सवाला मंडप व्यावसायिक, डेकोरेटर्स, केटरर्स, इव्हेंट प्रोफेशनल्स तसेच विविध व्यावसायिक बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. कार्यक्रमासाठी पद्मावती जर्मन हॅंगर टेंट हे प्रमुख सहयोगी असून केडी एक्स्पो आणि कोरस्पेसेस सोल्यूशन एलएलपी यांचेही सहकार्य लाभले आहे. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९९२२८ ७९४८१ किंवा ९५६१५ ७२७३१ या क्रमांकांवर संपर्क साधावा.




















Join Our Whatsapp Group