पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड शहरातील बंजारा समाजासाठी स्वतंत्र बंजारा भवन / समाज मंदिर उभारण्यासाठी जागा आरक्षित करावी, तसेच सायन्स पार्कला माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे नाव देण्यात यावे, या मागण्यांसाठी पिंपरी-चिंचवड अखिल बंजारा समाजाच्या शिष्टमंडळाने महापौर रवि लांडगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

शहरात मोठ्या संख्येने वास्तव्य करणाऱ्या बंजारा समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमांसाठी स्वतंत्र वास्तूची आवश्यकता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. समाजाच्या विविध कार्यक्रमांसाठी एकत्रित ठिकाण उपलब्ध व्हावे यासाठी महानगरपालिकेने जागा आरक्षित करून बंजारा भवन उभारणीसाठी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी पिंपरी-चिंचवड गोरसेना अध्यक्ष नितीन किसन चव्हाण, गीता नितीन चव्हाण, रावसाहेब राठोड, प्रेम पवार, आकाश चव्हाण, सचिन, रमेश राठोड, विनायक चव्हाण, शुभम खैरनार, सतीश चव्हाण, प्रतीक राठोड, रोहित चव्हाण, अल्ताफ मुजावर, प्रकाश डोंगरे आदींसह शिष्टमंडळ उपस्थित होते. महापौर रवि लांडगे यांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.




















Join Our Whatsapp Group