मनोज जरागेंनी इशारा देताच रात्रीत अध्यादेश
मागण्यांवर आज रात्रीपर्यंत बाबतीत आदेश काढावा. अन्यथा, आज (27 जानेवारी) दुपारी बारानंतर आझाद मैदानाकडे कूच करू असा इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला होता. जरांगे पाटील यांच्यासह हजारो आंदोलकांचा ताफा वाशी, नवी मुंबईत या ठिकाणी थांबला होता. अध्यादेश मिळाला तरी आझाद मैदानाकडे गुलाल उधळण्यासाठी जाणार आणि नाही मिळाल्यास त्याठिकाणीच उपोषण करू असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, त्यांनी अध्यादेश मध्यरात्री काढल्यानंतर आझाद मैदानाकडील प्रवास थांबवला आणि आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली.
सरकारने काढलेल्या जीआरमुळे मराठ्यांना आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने पूर्ण झाला असून 54 लाख नोंदी सापडलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मुंबईच्या वेशीवर वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मनोज जरांगे पाटील यांनी काल (26 जानेवारी) 13 मागण्या करता राज्य सरकारला आझाद मैदानात आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. यामध्ये अत्यंत काथ्याकूट झालेल्या सगेसोयरे हा कळीचा मुद्दा होता. या मुद्यावरून सरकारने एक माघार घेत या प्रमुख मागणीसह इतर मागण्या मान्य करत राज्य सरकारने जीआर मध्यरात्रीच काढण्यात आला. सोबतच नोंदी सापडलेल्यांच्या सगसोयऱ्यांनाही लाभ होणार असल्याने जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.























Join Our Whatsapp Group