पिंपरी (Pclive7.com):- वेगात धावणाऱ्या कारच्या छतावर बसून स्टंटबाजी करणे दोन तरुणांना चांगलेच महागात पडले आहे. या स्टंटबाजीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी तातडीने या तरुणांचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. तसेच दोघांवर गुन्हा दाखल करत त्यांची कारही जप्त केली आहे.

प्रतिक सुशिल शिंगटे (वय २४, कृष्णानगर, निगडी) आणि ओमकार कृष्णा मुंढे (वय २०, निगडी) अशी अटक केलेल्या तरुणांची नावे आहेत. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक योगेश सुरेश गायकवाड यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंगटे हा चिकन आणि वडापाव सेंटर चालवितो. तर, ओमकार मुंढे हा निगडी पोलीस लाइनमध्ये राहत आहे. गुरुवारी टेल्को कंपनीच्या समोरील रस्त्यावर केएसबी चौकात शिंगटे हा वेगाने कार चालवत होता तर मुंढे हा कारच्या छतावर बसून स्टंटबाजी करत होता.























Join Our Whatsapp Group