पिंपरी (Pclive7com):- निगडी से.22 विभागात अमृत योजनेअंतर्गत रस्त्याची खोदाई करण्यात आली होती. परंतु काम झाल्यानंतरही ठेकेदाराकडून खोदलेल्या रस्त्याची दुरुस्ती न केल्याने तेथे अपघात होत आहेत. त्यामुळे अमृत योजनेच्या ठेकेदारावर कारवाई करण्यात यावी व तात्काळ नादुरुस्त रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.
याबाबत दिपक खैरनार यांनी मनपा आयुक्तांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, प्रभाग क्र.13, निगडी से. क्र.22 विभागातील आझाद चौक ते काळभोर गोठा व आझाद चौक ते चाँदतारा चौक या रस्त्यावर अमृत योजनेअंतर्गत पाइपलाइन टाकण्याचे काम करण्यात आले होते. यात कंत्राटदाराने रस्त्यावर खाेदकाम केले. मात्र, काम झाल्यानंतर खोदण्यात आलेल्या रस्त्याची दुरुस्ती न करता रस्त्यावर खडी टाकण्यात आली आहे. या नादुरुस्त रस्त्यामुळे अनेक वाहने स्लिप होऊन पडली आहेत तर अनेक नागरिकांना यामुळे दुखापत झालेली आहे.
यासंदर्भात तक्रारी करून देखील महापालिका प्रशासन तसेच संबंधित ठेकेदार यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे, ही अत्यंत खेदाची बाब आहे. तरी सदरील तक्रारीची दखल घेऊन खोदलेल्या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी, व संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करण्यात करावी. अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते दिपक खैरनार यांनी केली आहे.

























Join Our Whatsapp Group