पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या नियुक्त्यांमध्ये महत्त्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानुसार नव्याने बदलीवर व पदोन्नतीवर हजर झालेल्या अधिकाऱ्यांना तात्पुरत्या स्वरूपात विविध विभागांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. पुढील आदेशापर्यंत या नियुक्त्या लागू राहणार आहेत.

पोलिस आयुक्तालय मंजूर झाल्यानंतर प्रथमच शहरासाठी १० अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी ८ सहाय्यक आयुक्त संपूर्ण कारभार सांभाळत होते. आता ही संख्या वाढून १६ झाली आहे.
नव्या आदेशानुसार निलेश विश्वासराव देशमुख यांची वाहतूक शाखेत, सुदर्शन साईदास राठोड यांची गुन्हे-१ शाखेत, प्रशांत बाबासो ढोले यांची पिंपरी विभागात, प्रिया देविदास ढमाळे यांची महाळुंगे विभागात, तर मनीषा विश्वंभर कदम यांची सांगवी विभागात सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पदोन्नतीवर हजर झालेले सुनील पांडुरंग पंधरकर यांच्याकडे विशेष शाखेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच रोहिणी ज्ञानदेव बनकर यांची सायबर व आर्थिक गुन्हे शाखेत नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय, सचिन तुकाराम कदम यांची महाळुंगे विभागातून गुन्हे-२ शाखेत, प्रवीण बाळासाहेब मोरे यांची गुन्हे-२ मधून देहूरोड विभागात, तर विठ्ठल खंडुजी कुबडे यांची पिंपरी विभागातून हिंजवडी विभागात बदली करण्यात आली आहे.
संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या नियुक्तीच्या ठिकाणी तातडीने हजर होऊन कार्यभार स्वीकारावा तसेच अनुपालन अहवाल सादर करावा, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.




















Join Our Whatsapp Group