पिंपरी (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहराला आज (दि.१६) सायंकाळी अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसामुळे शहरात २४ हून अधिक ठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडल्या असल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून देण्यात आली आहे.
अग्निशमन विभागाचे अधिकारी ऋषिकांत चिपाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सायंकाळी अवकाळी पावसामुळे मुख्य अग्निशमन केंद्राच्या अग्निशमन नियंत्रण कक्षास जवळपास 24 झाडे पडण्याच्या तक्रारी आल्या. तसेच एका ठिकाणी आगीचा आणि एका ठिकाणी ऑईल गळती बाबतचे कॉल प्राप्त झाले होते. अग्निशमन विभागाचे पथके शहरात विविध ठिकाणी कार्यरत असून मदतकार्य सुरू आल्याची माहिती ऋषिकांत चिपाडे यांनी दिली.