पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी शनिवारी (दि.२०) विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह दहा जणांनी एकूण २२ उमेदवारी अर्ज नेले.

आकुर्डी येथील पीएमआरडीएच्या इमारतीमधील निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात अर्जवाटप व दाखल करण्यात येत आहेत. आतापर्यंत एकूण ४९ जणांनी एकूण ९२ उमेदवारी अर्ज नेले आहेत.
खासदार बारणे (थेरगाव, शिवसेना) तसेच, सुहास राणे (लोणावळा, अपक्ष), शेखर चंदनशिवे (पिंपरी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस), अॅड. राजू पाटील (वाकड, अपक्ष), अॅड. पूजा कलाटे (वाकड, अपक्ष), विजय वाघमारे (वाकड, बहुजन समाज पार्टी), सागर जगताप (पिंपळे सौदागर, बहुजन समाज पार्टी), भाऊ अडागळे (निगडी, महाराष्ट्र मजूर पक्ष), किशोर साळवे (गणेशनगर, अपक्ष), उत्तम कांबळे (पिंपरी, अपक्ष), शिवाजी जाधव (थेरगाव, भारत राष्ट्र समिती) यांनी उमेदवारी अर्ज नेले आहेत.
























Join Our Whatsapp Group