पिंपरी (Pclive7.com):- घरगुती वापराच्या सिलिंडरमधून लहान सिलिंडरमध्ये गॅसची चोरी केली. तसेच गॅस रिफिलिंगसाठी जागा उपलब्ध करून दिली. त्यामुळे जागा मालकाविरोधात ही पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातर्फे काळेवाडी येथील रहाटणी लिंक रस्त्यावरील छत्रपती चौकातील राजे गॅस इलेक्ट्रॉनिक अॅण्ड सर्व्हिसेस या दुकानात सोमवारी (दि.२२) रात्री पावणेनऊच्या सुमारास ही कारवाई केली.
विजय बालाजी भोसले (रा. कैलासनगर, थेरगाव), असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्यासह शंकर नखाते (रा. रहाटणी) याच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिस अंमलदार भगवंता मुठे यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि.२३) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
























Join Our Whatsapp Group