पिंपरी (Pclive7.com):- मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या (गुरुवारी) कामशेत व पिंपरी येथे जाहीर सभा घेणार आहेत.
मावळचे आमदार सुनील शेळके, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गव्हाणे व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांनी ही माहिती दिली.
पुणे-मुंबई महामार्गालगत कामशेत येथे दुपारी चार वाजता तर पिंपरीत डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळील मैदानावर संध्याकाळी सहा वाजता अजित पवार यांची जाहीर सभा होणार आहे. या दोन्ही सभांना महायुतीच्या कार्यकर्त्यांबरोबरच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीकडून सातत्याने करण्यात येत असलेला अपप्रचार व आरोप यांना अजित पवार काय उत्तर देणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे.
























Join Our Whatsapp Group