सांगवी (Pclive7.com):- सांगवीमध्ये पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि.२९) रात्री पावणेदहा वाजता घडली. दीपक कदम (वय ३०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सांगवी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माहेश्वरी चौक येथील इंद्रप्रस्थ सोसायटी समोरील मुख्य रस्त्यावर दीपक कदम याच्यावर एकाने गोळ्या झाडल्या. दिपकच्या चेहऱ्यावर दोन गोळ्या लागल्या. त्याला तात्काळ उपचारासाठी औंध येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलिसांसह गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. गोळ्या झाडून आरोपी पळून गेला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. दीपक हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर यापूर्वी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, लोकवस्तीत आणि पोलीस स्टेशन अगदी हाकेच्या अंतरावर असताना घडलेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
























Join Our Whatsapp Group