पिंपळे सौदागर (Pclive7.com):- पिंपरी चिंचवड शहरात झपाट्याने वाढणाऱ्या डेंगू आजाराबाबत महापालिका प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात. तसेच डेंगू मुक्त शहर करण्यासाठी तातडीने योग्य पाऊले उचलावीत अशी मागणी माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

नाना काटे यांनी यासंदर्भात महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पावसाळा सुरू आहे, साथीच्या आजाराने रुग्ण वाढत असून अशातच शहरात डेंगू रुग्णांची संख्या देखील वाढत असून याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. शहरात अनेक सार्वजनिक, वैयक्तिक ठिकाणी, झाडाची कुंडी, पाळीव प्राण्यांसाठी ठेवण्यात आलेली भांडी, टायर, मोकळे डब्बे, आदी ठिकाणी पाणी साठवले जातेय. त्या साठवलेल्या पाण्यात डेंगू डासउत्पत्ती वाढत असून, संबंधित याकडे दुर्लक्ष करीत असून, या हलगर्जीपणामुळे शहरातील डेंगू रुग्णाची संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

याचा परिणाम म्हणून आपल्या आरोग्य यंत्रणेवर होत असून, पर्यायी रुग्णांना उपचारासाठी महापालिकेच्या रुग्णालयात बेड, व औषध उपलब्ध होत नसून नागरिकांना या नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तसेच शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात औषधाचा देखील तुटवडा भासत आहे, हि खूप गंभीर बाब असून, पाण्याची साठवणूक करून योग्य ती काळजी न करणाऱ्या व नियम न पाळणाऱ्यावर योग ती कडक कारवाई कारवाई करण्यात यावी.

शहरातील डेंगू बाधित रुग्णाची वाढती संख्या पाहता, आपल्या आरोग्य यंत्रणेच्या परीस्थितीचे व आजाराचे गांभीर्य पाहता यावर लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात व शहरातील डेंगू या आजारावर उपचार करण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्याचे आदेश देण्यात यावे. तसेच विविध आस्थापनांची तपासणी करून डासोत्पत्ती स्थळे नष्ट करण्याचे सूचित करण्यात यावे. तसेच या डेंगू बाधित रुग्णांवर शहरातील महापालिकेच्या रुग्णालयात मोफत उपचार करून देण्यात यावेत अशी मागणी नाना काटे यांनी केली आहे.























Join Our Whatsapp Group