दापोडी (Pclive7.com):- दापोडी येथील गणेश इंग्लिश मेडीयम स्कूल व जुनिअर कॉलेजमधे दिंडी सोहळा संपन्न झाला. यावेळी शाळेचे संस्थाप्रमुख एस.बी. पाटील, शाळेचे विश्वस्त गणेश पाटील, आकाश पाटील व मंगेश पाटील तसेच शाळेचे सहयोगी संचालक सुनील शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

ज्ञानोबा तुकोबांच्या गजरात, श्रीविठ्ठल नाम जयघोष करत, भक्तिमय वातावरणात पालखी सोहळा पार पडला. यावेळी विठ्ठल रुक्मिणी आणि वारकरी संतांच्या वेशभूषेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. सर्वप्रथम विठ्ठल रुक्मिणी, टाळ, मृदंग आणि पवित्र तुळशी यांच्या प्रतिमांचे मुख्याध्यापक महेंद्र काटकर सर, उपमुख्याध्यापक शाम काळे सर यांच्या शुभहस्ते पार पडले.

यावेळी परिसरामध्ये टाळ-मृदंगाचा गजर करत पालखी सोहळा दापोडीगाव येथील विठ्ठल तरुण मंडळ, वरील आळी मंदिरात दाखल झाला. पालखी मंदीरात आल्यानंतर त्या ठिकाणी अभंग आणि भक्ती गीते सादर केली. सर्व छोट्या वारकऱ्यांनी फुगड्यांचा देखील आनंद घेतला व विठ्ठलाची आरती घेतली. त्यानंतर परिसरातून विठ्ठल नामाचा जयघोष करत विद्यार्थ्यांनी पायी दिंडी सोहळा अनुभवला.























Join Our Whatsapp Group