भोसरी (Pclive7.com):- गेल्या २४ तासापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भोसरीतील चिखली, मोरे वस्ती, घरकुल वसाहत, साई कॉलनी यासह अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. अनेक घरात पाणी शिरून नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नागरिकांच्या मदत कार्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अजित गव्हाणे हे स्वतः सकाळपासून पाण्यात उतरले आहेत. ज्या ठिकाणी पाणी साचले आहे, त्या प्रत्येक ठिकाणी भेट देऊन महापालिका प्रशासन तसेच आपत्कालीन पुर नियंत्रण पक्षाला संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.

गेल्या २४ तासापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पिंपरी चिंचवडसह भोसरी परिसरातील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या अतिवृष्टीमुळे चिखली, मोरे वस्ती, घरकुल, साई कॉलनी यासह अनेक ठिकाणी सखल भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आज सकाळपासूनच अजित गव्हाणे हे स्वतः मदतकार्यासाठी उतरले आहेत. त्यांनी घरकुल, मोरे वस्ती, चिखली यासह अनेक भागांना भेट दिली. ज्या ज्या ठिकाणी पाणी साचले आहे, त्या ठिकाणी स्वतः हजार राहून प्रशासनाला फोन करून तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.























Join Our Whatsapp Group