पिंपरी (Pclive7.com):- मोबाईलवर बोलत असताना तरुणाने घरासमोरून गेलेली विजेची तार पकडली. त्यामुळे विजेचा धक्का लागून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना मोशीतील जाधववाडी परिसरात घडली.

रामब्रज हरिसिंग तेगोर (२२, रा. पडवळनगर, थेरगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक गणेश जामदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. ११) सकाळी रामब्रज हे फरशी बसविण्याचे काम करण्यासाठी जाधववाडीत आले होते.

सकाळी ११ वाजताच्या सुमारास रामब्रज यांना फोन आला. फोनवर बोलण्यासाठी ते गॅलरीमध्ये गेले. या घरासमोरून विजेची तार गेली होती. बोलताना अचानक रामब्रज यांनी विजेची तार हातात पकडली. यामुळे विजेचा जोरदार धक्का बसून ते खाली कोसळले. ते भाजल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.





















Join Our Whatsapp Group