चिखली (Pclive7.com):- श्री क्षेत्र टाळगाव चिखली ग्रामस्थांच्या पुढाकाराने ज्येष्ठ नागरिकांसाठी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज विरंगुळा केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. या विरंगुळात केंद्रात ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

टाळगाव चिखली याठिकाणी जेष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र तसेच ज्येष्ठ नागरिकांना विसाव्यासाठी जागा नसल्याची उणीव ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर टाळगाव चिखली ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विरंगुळा केंद्राची उभारणी करण्यात आली. नुकतेच या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले असून ते जेष्ठ नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहे.
या विरंगुळा केंद्राचा उपयोग येथे येणाऱ्या जेष्ठ नागरिकांना आपले सुख दुःख तसेच आपल्या विचारांची एकमेकांसोबत देवाण घेवाण करण्यासाठी तसेच गावातील जेष्ठ नागरिकांकडुन गावाच्या प्रगती विषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन होईल व सर्वात महत्त्वाचे म्हणजे जेष्ठ नागरिकांना या विरंगुळा केंद्रात आपला वेळ आनंदात वितरीत करता येवू शकतो या उद्देशाने हे विरंगुळा केंद्राची उभारणी टाळगावच्या ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.






















Join Our Whatsapp Group