पिंपरी (Pclive7.com):- कोलकाता येथील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टर, तसेच बदलापूर, अकोला व पुणे येथे अल्पवयीन निरागस मुलींवर झालेल्या बलात्कार व लैंगिक अत्याचाराच्या विरोधात पिंपरी चिंचवड महिला काँग्रेसच्या वतीने काळी फीत लावून कॅन्डल मुक मोर्चा काढत निषेध व्यक्त करण्यात आला. हे निषेध आंदोलन शहर महिला काँग्रेसच्या शहराध्यक्षा सायली नढे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

निगडी ओटा स्कीम येथे आयोजित करण्यात आलेल्या मुक मोर्चा दरम्यान हातात मेणबत्या घेऊन परिसरात निषेध फेरी काढण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात महिलांचा सहभाग होता. हा कॅन्डल निषेध मार्चा भीमशक्ती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेजवळ व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेजवळ संपन्न झाला. याप्रसंगी दोन्ही महापुरुषांच्या प्रतिमांना अभिवादन करून स्मारक परिसरात मेणबत्त्या प्रज्वलित करून अत्याचार पीडितांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी निगारताई बारस्कर, अभिमन्यू दहीतुले, नरेंद्र बनसोडे, उमेश खंधारे, कौस्तुभ नवले, आशा भोसले, सुप्रिया पोहारे, प्रियंका सगट, विशाल सरोदे, आबा खराडे, प्रज्ञा जगताप, स्वाती शिंदे, स्वाती पाटोळे, अश्विनी सगट, शोभा गायकवाड, अश्विनी पाटोळे, सारिका गायकवाड, रेखा साळवे, राणी वैरागी, यमुना पाटोळे, शोभा गायकवाड, सुशीला साळवे, अंतिकाबाई हातागळे, जय ठोंबरे, तन्मेश इंगावले तसेच महिला पदाधिकारी व कार्यकर्त्या उपस्थित होत्या.























Join Our Whatsapp Group