चिंचवड (Pclive7.com):- चिंचवड विधानसभेवरून आमदार पंकजा मुंडे यांनी भाजप नक्कीच मार्ग काढेल असे सुतोवाच केले आहेत. पंकजा मुंडे यांची आज चिंचवड विधानसभा मतदारसंघात बैठक होती. बैठकीनंतर त्या प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. चिंचवड विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्यासह त्यांचे दीर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप हे इच्छुक आहेत. यावरूनच पंकजा मुंडे यांनी वक्तव्य केले आहे.

भाजपने आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पंकजा मुंडे यांच्याकडे चिंचवड विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार त्यांनी मंगळवारी काळेवाडीत पदाधिकऱ्यांची बैठक घेतली. चिंचवडमधून निवडणूक लढविण्याबाबत विद्यमान आमदार अश्विनी जगताप आणि त्यांचे दीर भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्यासह माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे, चंद्रकांत नखाते इच्छुक आहेत.

यातून मार्ग कसा काढणार असे विचारले असता मुंडे म्हणाल्या, की विधानसभा मतदार संघानिहाय दौरे सुरू आहेत. या बैठकीत १०० पदाधिकाऱ्यांची उपस्थिती अपेक्षित असून त्यांच्याशी संभाषण केले आहे. संघटनात्मक विषयावर चर्चा केली आहे. विधानसभा निवडणुकीची पूर्व तयारी सुरू आहे. चिंचवडमधून निवडणूक लढविण्यासाठी पक्षात इच्छूकांची संख्या मोठी आहे. इच्छूकांच्या यादीतून एक उमेदवार द्यावा लागतो. त्याचा चांगला अनुभव पक्षाच्या कोअर कमिटीला आहे. त्यामुळे योग्य तो निर्णय घेतला जाईल असे त्या म्हणाल्या.






















Join Our Whatsapp Group