पिंपरी (Pclive7.com):- प्रवासी वाहतूक करताना झालेल्या ओळखीतून रिक्षाचालकाने विधवा महिलेसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ मध्ये राहण्यास सुरुवात केली. दरम्यान, तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा गळा आवळून खून केला. त्यानंतर मृतदेह रिक्षात ठेवून पळ काढला. ही घटना थेरगाव येथे बुधवारी (दि.११) सकाळी जगतापनगरमध्ये उघडकीस आली.

शिवानी सोमनाथ सुपेकर (२८, रा. वडगाव मावळ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी शारदा नवीन जोशी (३५, रा. गणेशनगर कॉलनी, बोपखेल) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, विनायक अनिल आवळे (३५, रा. एमएम चौक, काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा रिक्षाचालक असून विवाहीत आहे. मात्र, पत्नीसोबत राहत नसल्याने तो एकटाच राहत होता. तसेच, फिर्यादी यांची बहीण शिवानी यांच्या पतीचेदेखील यापूर्वी निधन झाले आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रवासी वाहतूक करत असताना आरोपी विनायक याची शिवानीशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाल्यानंतर मागील दोन महिन्यांपासून ते ‘लिव्ह इन रिलेशनशीप’ मध्ये थेरगावात राहत होते. दरम्यान, आरोपी विनायक हा शिवानी यांच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. संशयावरूनच त्याने गळा आवळून शिवानीचा खून केला. त्यानंतर मृतदेह रिक्षात ठेवून आरोपी फरार झाला आहे. आरोपीच्या शोधात स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके रवाना झाली आहेत.






















Join Our Whatsapp Group