पिंपरी (Pclive7.com):- फिजिओथेरपी क्षेत्रातील वाढती मागणी पाहता, विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रात करिअर करण्याची उत्तम संधी असल्याचे मत इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपिस्ट (आय ए पी) महाराष्ट्र वूमन सेलच्या प्रमुख डॉ. सुवर्णा गणवीर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाने विद्यार्थी, शिक्षक आणि डॉक्टर यांना एकत्र येण्यासाठी एक व्यासपीठ दिले ज्यामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली आणि अशा प्रकारचे कार्यक्रम भविष्यातही आयोजित केले जावेत, असा त्यांनी आग्रह धरला.

आकुर्डी येथील रत्नलोक हॉटेलमध्ये रविवारी (दि.१५) (आय ए पी) पिंपरी चिंचवड शाखा आणि वूमेन सेलच्यावतीने आयोजित कार्यक्रमात, पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील फिजिओथेरपी महाविद्यालयातील १५ पदवीधर व ८ पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा आणि काही डॉक्टरांचा सन्मान करण्यात आला.
शहरात १५ वर्षांपासून फिजिओथेरपिस्ट म्हणून सेवा देणाऱ्या ५ फिजिओथेरपीस्ट, डॉ. मिनाक्षी पंडीत, डॉ. सुषमा बाफना, डॉ. तारीक शेख, डॉ. प्रियंका भांडगे, डॉ. अरुंधती करमलकर यांना गौरवण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सुवर्णा गणवीर आय.ए.पी महाराष्ट्र वूमन सेलच्या प्रमुख, डॉ. उज्वल येवले आय ए पी महाराष्ट्र हेड पिंपरी चिंचवड शाखेच्या प्रमुख डॉ. संजीवनी कांबळे, आय ए पी पिंपरी चिंचवड शाखा प्रमुख डॉ. जयश्री कोतवाल, डॉ. तुषार पालेकर, डॉ. स्नेहल घोडे, डॉ. फरहीन पटेल, डॉ. गौरांग बक्षी, डॉ. मयुरा देशमुख, डॉ. स्मिता शिंदे उपस्थित होते.





















Join Our Whatsapp Group